संत मागे पाणी नेदी एक चूळी – संत तुकाराम अभंग – 317

संत मागे पाणी नेदी एक चूळी – संत तुकाराम अभंग – 317


संत मागे पाणी नेदी एक चूळी ।
दासीस आंघोळी ठेवी पाणी ॥१॥
संतासी देखोनी होय पाठमोरा ।
दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या ।
भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका ।
जातो यमलोका भोगावया ॥३॥

अर्थ

संतांनी जर थोडे पाणी प्यायला मागितले तर चूळ भरण्या इतके पाणी देखील हा एखादा मनुष्य देत नाही पण एखाद्या दासी करता अंघोळ करण्याकरता पाणी तापवून ठेवतो.संत जर दिसले तर तो संतांना पाहून त्यांच्याकडे पाठ करतो आणि दासीच्या मुलांना जर पाहिले तर मुके घेतो.संतांचे त्यांच्या पाठीमागे तो टवाळ्या करण्याचे काम करतो पण मात्र दासीच्या चोळ्या मात्र आवडीने धुतो.तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंका तो माणूस मेल्यानंतर यमलोकात त्याचे भोग भोगण्या करिता जातो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.