काय खावें आतां कोणीकडे जावें – संत तुकाराम अभंग – 316

काय खावें आतां कोणीकडे जावें – संत तुकाराम अभंग – 316


काय खावें आतां कोणीकडे जावें ।
गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥
कोपला पाटील गांविचे हे लोक ।
आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥
आतां येणें चवी सांडिली म्हणती ।
निवाडा करिती दिवाणांत ॥२॥
भल्या लोकीं यास सांगितली मात ।
केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला ।
शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥४॥

अर्थ

आता काय खावे कोणाच्या आधारावर रहावे कोठे जावे? गावचा पाटील आणि गावातील लोक माझ्यावर रागावले आहेत क्रोधित झाले आहेत त्यामुळे आता कोण मला भिक घालणार? हे लोक मला म्हणतात की मी मर्‍यादा सोडली आहे आणि त्याचा निवाडा करण्यासाठी मला न्यायालयात दाखल केले आहे व मला दोषी ठरविण्यात येत आहे.गावातील प्रस्तापित लोकांनी मी वाईट आहे असे सर्वांना सांगितले आहे व माझा गरिबाचा यांनी सर्वांनी घात केला आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता यांचा संग चांगला नाही या विठ्ठलाचे भजन करणे हेच उत्तम आहे व आता त्याला शोधीत जाणे हेच चांगले.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.