नाही दुकळलों अन्ना – संत तुकाराम अभंग – 315
नाही दुकळलों अन्ना ।
परि या मान जनार्दना ॥१॥
देव केला सकळसाक्षी ।
काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥
भोगी भोगविता ।
बाळासवें तोचि पिता ॥२॥
कर्म अकर्म जळालें ।
प्रौढें तुका तें उरले ॥३॥
अर्थ
मी फक्त अन्न खाण्याकरता जगण्याला स्थान दिले असे नाही मी अन्न खातो कारण या जनार्दनाचा मान राखावा म्हणून.सर्व चांगले कर्म करताना व इतर वेळेस देवाला मी साक्षी केले आहे.भोगी आणि भोगविता तोच आहे जसे बाळका बरोबर त्याचा पिता असल्यावर तोचं त्याला खाण्यापिण्याचे व्यवस्था करतो त्याप्रमाणे हा देव माझी सर्व व्यवस्था करतो आहे.तुकाराम महाराज म्हणतात चांगले व वाईट कर्मे ज्या ठिकाणी जळून जातात अशा उच्च ठिकाणी मी विराजित झालो आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.