मी तों दीनाहूनि दीन – संत तुकाराम अभंग – 314

मी तों दीनाहूनि दीन – संत तुकाराम अभंग – 314


मी तों दीनाहूनि दीन ।
माझा तूज अभिमान ॥१॥
मी तों आलों शरणागत ।
माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥
दिनानाथा कृपाळुवा।
सांभाळावें आपुल्या नांवा ॥२॥
तुका म्हणे आतां ।
भलें नव्हे मोकलितां ॥३॥

अर्थ

देवा मी तर दिना पेक्षाही दिन आहे तरी पण तुला माझा अभिमान आहे.मी तुला शरण आलेलो आहे त्यामुळे हे देवा तू माझे स्वहित म्हणजे कल्याणकर.हे दीनानाथा कृपा घना तुझे ब्रीद, तू दयाळू आहेस याचे पालन केले पाहिजे.तुकाराम महाराज म्हणतात तू जर माझ्याकडे लक्ष दिले नाहीस तर तुला हे असे शोभणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.