दोष पळती कीर्तनें – संत तुकाराम अभंग – 313

दोष पळती कीर्तनें – संत तुकाराम अभंग – 313


दोष पळती कीर्तनें ।
तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥
हें कां करूं आदरिलें ।
खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥
तुम्ही पापा भीतां ।
आम्हां उपजावया चिंता ॥२॥
तुका म्हणे सेवा ।
कळीकाळा जिंकी देवा ॥३॥

अर्थ

तुझ्या नामसंकीर्तनाने सर्व दोष पळतात.देवा हे वचन खोटे तर नाही ना?आमच्या हातून काही पाप होवू नये याची भीती तुम्हाला वाटते तर आम्हाला जन्माला येण्याची भीती वाटते.तुकाराम महाराज म्हणतात तुमचे नामसंकीर्तन केल्याने भक्ताला कळीकाळाची भीती नसते त्यामुळे मी तुमचे नामस्मरण कायम करत असतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.