करा नारायणा – संत तुकाराम अभंग – 312
करा नारायणा ।
माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥
वृत्ति राखा पायांपाशीं ।
वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥
पाळोनियां लळा ।
आतां पाववावें फळा ॥२॥
तुका म्हणे दींन ।
त्यांचा हरतिया सीण ॥३॥
अर्थ
हे नारायणा माझ्या दुःखाचे तुम्ही खंडण करा.माझी वृत्ती तुमच्या चरणांजवळ राहू द्या आणि तुम्ही माझ्या मनात तुम्ही वस्ती करा माझ्या चित्ता रहा.मला हे फळ मिळवून द्या आणि एवढा माझा लाड तुम्ही पुर्ण करा.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही दिन लोकांचे दुःख दूर करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.