त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं – संत तुकाराम अभंग – 311

त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं – संत तुकाराम अभंग – 311


त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं ।
आमचें त्या काई असे ओझें ॥१॥
पाषाणाचे पोटीं बैसला दुर्दुर ।
तया मुखीं चारा कोण घाली ॥ध्रु.॥
पक्षी अजगर न करी संचित ।
तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका म्हणे तया भार घातलिया ।
उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥

अर्थ

या देवाला त्रैलोक्याचे पालन करताना कंटाळा येत नाही आमचे कसले ओझे आहे.पाषाणाच्या पोटात बेडूक बसलेला असतो मग त्याच्या पोटात कोण अन्न घालते.काही पक्षी, अजगर हे कधीही अन्न शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत पण तरीही तो त्यांचे पोट भरतो.तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगावर सर्व भार घातला तर तो दयाघन कधीही कोणाची उपेक्षा करीत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.