एक वेळ प्रायिश्चत्त ।
केलें चित्त मुंडण ॥१॥
अहंकारा नांवें दोष ।
त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥
अनुतापें स्नानविधि ।
यज्ञ सिद्धी देहहोम ॥२॥
जीवशिवा होतां चुका ।
तेथें तुका विनटला ॥३॥
अर्थ
माझ्या मनामध्ये अनेकप्रकारचे विकार घर करून होते त्याचे आता मी एकदमच मुंडण करून टाकले आहे हेच माझे प्रायचित्त आहे.मुख्य म्हणजे अहंकार नावाचा जो दोष आहे त्याला मी ओस पाडले आहे. विषयांमुळे मला जो अनुताप झाला त्यामध्ये मी स्नान केले व आत्मज्ञान रुपी अग्नीमध्ये देहाचे हवन केले.तुकाराम महाराज म्हणतात अज्ञान यामुळे जीव व शिव यांचा विरोध होत होता आता त्याचा म्हणजे अज्ञानाचा त्याग करून मूळ स्वरूप जे ब्रम्ह आहे ते मीच झालो आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.