तेलनीशीं रुसला वेडा ।
रागें कोरडें खातो भिडा ॥१॥
आपुलें हित आपण पाही ।
संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥
नाडिले लोकां टाकिला गोहो ।
बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥
शेजारणीच्या गेली रागें ।
कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥३॥
पिसारागें भाजिलें घर ।
नागविलें तें नेणे फार ॥४॥
तुका म्हणे वाच्या रागें ।
फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥
अर्थ
क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलनिवर रुसून तेल आनावयास गेला नाही व रुक्ष अन्न खात बसला .ज्याला आपले हित समजत नाही, हरी भक्ति करत नाही त्याचे अंति अहितच होते.एक स्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा, मुलबालांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते.एक स्रि शेजारनिवर रुसून घर सोडून गेली, तेव्हा तिच्या घरात कुत्रे शिरले.एकान घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधान स्वताचेच घर जाळले त्यात स्वतांचे नुक्सान स्वतानेच केले.एका स्रि ने उवा झाल्या म्हणून लुगडे सोडले, तर नागवेपणने तिचिच फजीति झाली, तुकाराम महाराज क्रोधच्या आहारी गेलेल्या व्यक्ति स्वताचे नुकसान स्वताच कश्या प्रकारे करुण घेतात याची उदाहरणे देतात.त्या मुळे आपल्याला आपली हित हे कळाले पाहिजे, आपला क्रोध आपल्याला आवरता आला पाहिजे, प्रपंच नुस्ताच पैश्याने नहीं चलात आणि नुस्ताच चगल्या माणसाने नाही चालत तर त्याला पर्मार्थाची जोड असायला हवि तेव्हा आपल्याला आपले हित अहित कळते.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.