मुखें बोले ब्रम्हज्ञान – संत तुकाराम अभंग – 309

मुखें बोले ब्रम्हज्ञान – संत तुकाराम अभंग – 309


मुखें बोले ब्रम्हज्ञान ।
मनीं धन आणि मान ॥१॥
ऐशियाची करीता सेवा ।
काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥.
पोटासाठीं संत ।
झाले कलींत बहुत ॥२॥
विरळा ऐसा कोणी ।
तुका त्यासि लोटांगणी ॥३॥

अर्थ

मुखाने ब्रम्‍हज्ञान सांगतो आणि मनामध्ये धन आणि मान याची अपेक्षा करतो.अशा माणसाची सेवा केली तर काय सुख प्राप्त होणार आहे या जिवाला?या कलियुगामध्ये पोट भरण्यासाठी अनेक लोक संत झालेले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये जर यापेक्षा कोणीही विरळा संत आहे तरच त्याच्या चरणी मी लोटांगण घेतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.