द्रव्य असतां धर्म न करी – संत तुकाराम अभंग – 308

द्रव्य असतां धर्म न करी – संत तुकाराम अभंग – 308


द्रव्य असतां धर्म न करी ।
नागविला राजद्वारीं ॥१॥
माय त्यासि व्याली जेव्हां ।
रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥
कथाकाळीं निद्रा लागे ।
कामीं श्वानापरी जागे ॥२॥
भोग स्त्रियेसि देतां लाजे ।
वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥
तुका म्हणे जाण ।
नर गाढवाहुनी हीन ॥४॥

अर्थ

आपल्याजवळ ज्यावेळी पैसे असतात त्यावेळी जो कोणत्याही प्रकारचे दानधर्म करीत नाही त्या मनुष्यास नंतर न्यायालयात राजदरबारात उभे केल्यास दंडास पात्र करून त्याला दंड केला जातो.त्याच्या आईने त्याला जेव्हा जन्म दिला त्यावेळेस सटवी तेथे नव्हती काय? बहुतेक त्यामुळेच तो जगला असावा.हरिकथा चालू असताना त्याला झोप लागते पण स्त्रीसंग करताना जसा कुत्रा कुत्रीचा मागे रात्रभर लागतो तसा त्या वेळी रात्री तो कामातुर होऊन, त्याला झोप येत नाही.या अशा मनुष्याने आपल्या धर्मपत्नीला एखादे लुगडे जरी घेऊन द्यायचे म्हटले तरी तो घ्यायचा नाही पण दासीचे वस्त्र उराशी घेऊन झोपतो.तुकाराम महाराज म्हणतात असे मनुष्य गाढवा पेक्षाही नीच आहेत असे समजावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.