गातों भाव नाहीं अंगीं – संत तुकाराम अभंग – 307

गातों भाव नाहीं अंगीं – संत तुकाराम अभंग – 307


गातों भाव नाहीं अंगीं ।
भूषण करावया जगीं ॥१॥
परि तूं पतितपावन ।
करीं साच हें वचन ॥ध्रु.॥
मुखें म्हणवितों दास ।
चित्तीं माया लोभ आस ॥२॥
तुका म्हणे दावीं वेश ।
तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥

अर्थ

मी हरीचे गीत गात आहे पण माझ्या अंतःकरणात भक्तीभावनाही या संसारात माझी प्रतिष्ठा वाढावी म्हणून मी प्रयत्न करीत आहे.पण हे देवा तू पतितपावना आहेस असे तुझे ब्रीद आहे म्हणून माझा उद्धार कर.मी मोठ्या हुशारीने तुझा भक्त आहे असे म्हणतो आणि माझ्या चित्तात लोभ मोह आस हे विकार आहेत.तुकाराम महाराज म्हणतात मी बाहेरून भक्तीचा वेश दाखवतो पण माझ्या चित्तात त्याचा लेशही नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.