नाम साराचें ही सार – संत तुकाराम अभंग – 306

नाम साराचें ही सार – संत तुकाराम अभंग – 306


नाम साराचें ही सार ।
शरणागत यमकिंकर ॥१॥
उत्तमा उत्तम ।
वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥
नाम जपतां चंद्रमौळी ।
नामें तरला वाल्हा कोळी ॥२॥
तुका म्हणे वर्णु काय ।
तारक विठोबाचे पाय ॥३॥

अर्थ

हरीचे नाम सर्व साराचे हि सार आहे त्यामुळे यमाचे किंकर नाम घेतल्याने साधकांना शरण येतात.या जगामध्ये सर्वात उत्तमात उत्तम असे हरीचे नाम आहे म्हणून पुरुषोत्तमाचे नाम घ्या.नामजपाने साक्षात शंकराचा कंठ दाह शांत झाला आणि वाल्या कोळी याचाही उद्धार झाला.तुकाराम महाराज म्हणतात मी आता आणखी काय वर्णन करू? या विठोबाचे चरण हे भवसागरातून तारणारे आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.