देवें जीव धाला – संत तुकाराम अभंग – 305
देवें जीव धाला ।
संसार तो कडू झाला ॥१॥
तेचि येताती ढेकर ।
आनंदाचे हरीहर ॥ध्रु.॥
वेधी आणिकांस ।
ऐसा जया अंगीं कस ॥२॥
तुका म्हणे भुक ।
येणें न लगे आणीक ॥३॥
अर्थ
देवाची प्राप्ती झाल्यामुळे माझा जीव गोड झाला आणि आता संसार कडू वाटत आहे. या हरीची प्राप्ती झाल्यामुळे मला आनंदाची ढेकरे येत आहेत. हे देवा तुमच्या मध्ये दुसऱ्याला आकर्षित करण्याची ताकत आहे सामर्थ्य आहे.तुकाराम महाराज म्हणतात या कारणामुळे मला आनंदात तहान भूक लागत नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.