ज्यांची खरी सेवा – संत तुकाराम अभंग – 304

ज्यांची खरी सेवा – संत तुकाराम अभंग – 304


ज्यांची खरी सेवा ।
त्याच्या भय काय जीवा ॥१॥
करितां स्वामीसवें वाद ।
अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥.
असावा तो धर्म ।
मग साहों जातें वर्म ॥२॥
वदे वाग्देवी ।
तुका विठ्ठली गौरवी ॥३॥

अर्थ

ज्याची खरी सेवा आहे निष्काम सेवा आहे त्याच्या जीवाला मग कसले भय राहणार आहे?त्याने प्रत्यक्ष हरीशी म्हणजे आपल्या स्वामीबरोबर वाद-विवाद जरी केला तरी तो त्याला अधिकाधिक आनंद वाटतो.आपले आचरण शुद्ध धर्माला धरून असावे मग दुसऱ्या कोणाचीही दोष जरी त्यांनी दाखविले तरी ते सहन करतात.तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी जे काही बोलते त्याला प्रत्यक्ष विठ्ठल प्रमाणात मानत आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.