करितां देवार्चन – संत तुकाराम अभंग – 303

करितां देवार्चन – संत तुकाराम अभंग – 303


करितां देवार्चन ।
घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते ।
संत पूजावे आरते ॥ध्रु.॥
शाळिग्राम विष्णुमूर्ती ।
संत हो का भलते याती ॥२॥
तुका म्हणे संधी ।
अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥

अर्थ

देवपूजा करताना अचानक घरी संत साधू आले तर,देवपूजा बाजूला सारून संत पूजा प्रथम करावी.जशी शाळीग्रामाची विष्णू मूर्ती असते तसेच संतही कोणत्या जातीचे असो त्यांचे पूजन केले पाहिजे.तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव घरी येणे म्हणजे देवपूजा करण्यापेक्षाही अधिक भाग्य आहे त्यामुळे अशी संधी आली तर कोणीही ती संधी न दवडता त्या संधीचा फायदा करून घ्यावा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.