येथील हा ठसा ।
गेला पडोनियां ऐसा ॥१॥
घरीं देवाचा अबोला ।
त्यासि तेंचि सवे त्याला ॥ध्रु॥.
नाहीं पाहावें लागत ।
एका एकींच ते रितें ॥२॥
तुका म्हणे जन ।
तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥
अर्थ
या भू लोकांमध्ये अशी एक प्रथा पडून गेलेली आहे,कि लोक देवाशी अबोलाधरतात देवाचे नाव घेत नाही त्यामुळे देवही त्याच्याशी अबोला धरून जो जसे वागेल तसेच तो वागतो.हे पाहण्याची गरज नाही की देव लोकाला आठवत नाही कारण लोक देवाला आठवीत नाही त्यामुळे दोघांचे एकमेकांविषयी हृदय मोकळे आहे.तुकाराम महाराज म्हणतात याच कारणामुळे देवात आणि लोकांत मोठे अंतर पडले आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.