झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग – 300
झाड कल्पतरू ।
न करी याचकीं आव्हेरू ॥१॥
तुम्ही सर्वी सर्वोत्तम ।
ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥
परिसा तुमचें देणें ।
तो त्या जागे अभिमानें ॥२॥
गाऱ्हाण्यानें तुका ।
गर्जे मारुनियां हांका ॥३॥
अर्थ
कल्पतरू हे झाड असून ते कोणत्याही याचकाचा कधीही अव्हेर करीत नाही.आणि देवा तुम्ही तर सर्वोत्तम असूनही याचिका ची इच्छा पूर्ण करत नाहीत याला काय म्हणावे? लोखंडाला सोने बनवणे हे परिसाचे अंगी तुम्ही गुण दिला आहे तो बिचारा त्याचे काम करतो आहे तेही न विसरता व अभिमानाने करतो.तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्यापुढे गाह्रणे मोठ्या आवाजात गर्जुन पुढे मांडत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.