महारासी शिवे ।
कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त कांहीं ।
देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥
नातळे चांडाळ ।
त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्तीं ।
तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
अर्थ
ज्याने अजुन क्रोधचा त्याग केला नाही तो जातीने ब्राम्हण असला तरी त्याला ब्रांम्हण म्हणू नये .त्याने देहान्त प्रयाचित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धि होत नाही .आशा मनुष्याचा चांडाळास देखिल विटाळ होतो कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते .तुकाराम महाराज म्हणतात, आशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणार्या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखिल त्याच जातीचा होतो त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.
View Comments
राम कृष्ण हरी