सावध झालों सावध झालों – संत तुकाराम अभंग – ३
सावध झालों सावध झालों ।
हरीच्या आलों जागरणा ॥१॥
तेथें वैष्णवांचे भार ।
जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥
पळोनियां गेली झोप ।
होतें पाप आड तें ॥२॥
तुका म्हणे तया ठाया ।
ओल छाया कृपेची ॥३॥
अर्थ
तुकाराम महाराज दोन वेळा सवध झालो असे म्हणून हरिच्या जागराला आलो असे म्हणतात.तेथे आता वैष्णवांची गर्दी झाली असून, हरी भजनांची गर्जना होत आहे .नाम साधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे.तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हरीकृपेचा ओलाव व छाया आहे .
सावध झालों सावध झालों – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.