वाजतील तुरें – संत तुकाराम अभंग – 298

वाजतील तुरें – संत तुकाराम अभंग – 298


वाजतील तुरें ।
येणें आनंदें गजरें ॥१॥
जिंकोनियां अहंकार ।
पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥
काळा नाहीं वाव ।
परिश्रमा कोठें ठाव ॥२॥
तुका म्हणे आतां ।
सोपें वैकुंठासी जातां ॥३॥

अर्थ
मला हरिप्राप्ती झाली आहे त्यामुळे मी आनंदाने मोठ्या गजराने नगारे वाजवीत आहे.मी अहंकाराला जिंकले आहे व त्या अहंकाराचा डोक्याची पायरी केले आहे व ती चढुन मी वर गेलो आहे.या ठिकाणी जर काळालाच वाव नाही तर जन्ममरणाच्या परिश्रमाला कोठे ठाव असणार आहे?तुकाराम महाराज म्हणतात जर अहंकारच राहिला नाही मग आता आम्हाला वैकुंठाला जाण्यास कसलीही भीती नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


वाजतील तुरें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.