पावे ऐसा नाश – संत तुकाराम अभंग – 297

पावे ऐसा नाश – संत तुकाराम अभंग – 297


पावे ऐसा नाश ।
अवघियां दिला त्रास ॥१॥
अविटाचा केला संग ।
सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥
आइताच पाक ।
संयोगाचा सकळिक ॥२॥
तुका म्हणे धणी ।
सीमा राहिली होऊनी ॥३॥

अर्थ
मीआता पर्यंत कोणाला जर त्रास दिला असेल तर त्याचा आता नाश होईल ,ते अशा प्रकारे म्हणजे मला जे त्रास होणार आहेत ते त्रास सर्व तो विठ्ठलच भोगत आहे कारण तो अवीट आहे.त्या पांडुरंग संग केल्यामुळे आमचा सर्वांशी संबंध आला आहे व त्या योगाने प्रेमसंबंधाचा स्वयंपाक मला खाण्यास मिळाला आहे.तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे मला मिळालेल्या तृप्तीची काही सीमाच नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


पावे ऐसा नाश – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.