न संडी अवगुण – संत तुकाराम अभंग – 296
न संडी अवगुण ।
वर्में मानीतसे सिण ॥१॥
भोग देतां करिती काई ।
फुटतां यमदंडें डोई ॥ध्रु.॥
पापपुण्यझाडा ।
देतां तेथें मोठी पीडा ॥२॥
तुका म्हणे बोला ।
माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥
अर्थ
दुष्ट माणसे कधी ही आपला अवगुण टाकीत नाहीत पण त्यांचा दोष त्यांना दाखवला कि मग त्यांना राग येतो.साधे त्यांनां दोष जरी सांगितले तरी त्यांना सहन होत नाही पण पुढे मात्र यमाच्या स्वाधीन झाल्यावर डोक्यात यम दंड पडल्यावर हे काय करणार आहेत.यमलोकात पाप-पुण्याचा झाडा करताना फार मोठे दुख भोगावे लागते.तुकाराम महाराज म्हणतात मी अशा लोकांना बोललोतर हे कष्टी होतात पण हे विठ्ठला मी हे त्यांच्या भल्या करतात बोलतो आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
न संडी अवगुण – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.