गौरव गौरवापुरतें ।
फळ सत्याचे संकल्प ॥१॥
कठिण योगाहुनि क्षेम ।
ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥
पावलें मरें सिवेपाशीं ।
क्लेश उरतती क्लेशीं ॥२॥
तुका म्हणे बहु आणी ।
कठिण निघालिया रणीं ॥३॥
अर्थ
मान सन्मान हा त्यावेळी गौरवा पुरता असतो पण खरे फळ म्हणजे सत्यसंकल्प करणे म्हणजे हरी नाम घेणे यातच आहे.प्राप्तीपेक्षा प्राप्त झालेली कोणतीही गोष्ट असेल तर त्याचे रक्षण करणे अवघड आहे जसे एखाद्याने सुग्रास जेवण केले पण त्याला ते पचन न होता वांती झाली तर ते व्यर्थ श्रम होय.एखादा मनुष्य वनातून जात असताना त्याच्या मागेच चोर लागले म्हणून धावत सुटतो आणि गावाच्या शिवा जवळ जाऊन मरण पावतो म्हणजे त्याने सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला पण त्याच्या पदरात शेवटी श्रममिळून तो शेवटी मरण पावतो.तुकाराम महाराज म्हणतात शूर पणाचा आव आणणारे लोक हे प्रत्यक्ष रणांगणात गेले तर त्यांना कठीण वाटते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.