भाव देवाचें उचित – संत तुकाराम अभंग – 294
भाव देवाचें उचित ।
भाव तोचि भगवंत ॥१॥
धन्यधन्य शुद्ध जाती ।
संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥
बहुत बराडी ।
देवा वरी आवडी ॥२॥
तुका म्हणे हें रोकडें ।
लाभ अधिकारी चोखडे ॥३॥
अर्थ
भगवंत भक्तीमध्ये भावच सर्वश्रेष्ठ आहे किंबहुना भक्तीभावच देव आहे.शुद्ध भाव असणारे भक्त खरोखर धन्य धन्य आहेत कारण त्यांच्या मनात भगवंताविषयी संदेह कसा असू शकतो.जे खरे भक्त असतात ते वाच्या प्रेमा विषयी हावरे असतात त्यांचे देवांवर अतिशय प्रेम असते.तुकाराम महाराज म्हणतात असेच भक्त भगवंत प्राप्तीचे खरे अधिकारी आहेत हे उघड आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भाव देवाचें उचित – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.