मजसवें नको चेष्टा – संत तुकाराम अभंग – 293
मजसवें नको चेष्टा ।
नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥
बैस सांडोनि दिमाख ।
जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥
येथें न सरे चार ।
हीण आणीक व्यापार ॥२॥
तुका विष्णुदास ।
रस जाणतो नीरस ॥३॥
अर्थ
भजनात व्यत्यय आणणाऱ्या दुर्जनाला महाराज म्हणतात अरे तु माझी चेष्टा करू नकोस मी काही साळी किंवा कोष्टी सामान्य नाही.तुझ्या मोठेपणाचा दिमाख सोडून इथे उगाच बस नाहीतर येथून चालता हो तुझे तोंड काळे कर.तुझा हा व्यापार वाईट वागणे हे माझे जवळ चालायचे नाही.तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्हाला सरस काय आणि निरास काय हे चांगले माहीत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मजसवें नको चेष्टा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.