मोहीऱ्याच्या संगें – संत तुकाराम अभंग – 292

मोहीऱ्याच्या संगें – संत तुकाराम अभंग – 292


मोहीऱ्याच्या संगें ।
सुत नव्हे आंगीजोगें ॥१॥
नाहीं तरी त्याचें भक्ष ।
काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥
स्वामीचिया अंगें ।
रूप नव्हे कोणाजोगें ॥२॥
तुका म्हणे खोडी ।
देवमणी नेदिती दडी ॥३॥

अर्थ
मोहरा नावाच्या मण्याला दोरा सुत गुंडाळले तर ते अग्नीत जरी टाकले तरी ते जळत नाही.नाहीतर सुताला जर अग्नीत टाकले तर ते जळणारच हे सांगायला कोणाची साक्ष जरुरी नाही.तसेच त्या मण्याप्रमाणे माझा स्वामी म्हणजे विठ्ठल परमात्मा याचा माझ्याशी संग असला कि मला कसलीही भीती नाही.तुकाराम महाराज म्हणतात घोड्याच्या गळ्यात जर देव मणी घातला तर तो घोडा कितीही खट्याळ असला तरी त्याचा तो दोष लपून जातो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


मोहीऱ्याच्या संगें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.