गोडीपणें जैसा गुळ – संत तुकाराम अभंग – 290

गोडीपणें जैसा गुळ – संत तुकाराम अभंग – 290


गोडीपणें जैसा गुळ ।
तैसा देव जाला सकळ ॥१॥
आतां भजों कवणे परी ।
देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥
उदका वेगळा ।
नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामीं ।
तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥

अर्थ
जसा गुळामध्ये सर्वत्र गोडपणा असतो तसाच देव आमच्यासाठी सर्वत्र झाला आहे.आता मी देवाचे भजन कसे करु कारण देवच माझ्या संपूर्ण शरीरामध्ये व्यापक आहे आत आणि बाहेर तोच आहे.पाण्याहून वेगळे पाण्याचे उठणारे तरंग नसतात.तुकाराम महाराज म्हणतात तसेच सोने आणि अलंकार हे जरी वेगळे वेगळे आहेत पण आहेत ते एकच तसेच देव आणि भक्त हे जरी वेगवेगळे असले तरी ते एकच आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


गोडीपणें जैसा गुळ – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.