आहे तें सकळ कृष्णासी – संत तुकाराम अभंग – 29

आहे तें सकळ कृष्णासी – संत तुकाराम अभंग – 29


आहे तें सकळ कृष्णासी अर्पण ।
न कळतां मन दुजें भावी ॥१॥
म्हणउनी पाठी लागतील भूतें ।
येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥
ज्याचे त्या वंचलें आठव न होतां ।
दंड हा निमित्ताकारणें हा ॥२॥
तुका म्हणे काळें चेंपियेला गळा ।
मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥

अर्थ
आपण जे काही कर्म करतो ते सर्व कृष्णाच्या कृपेनेच करतो त्यामुळे ते सर्व कृष्णाला अर्पण करावीत अशी भावना ठेवावी परंतु अज्ञानी जीव तसे न करता सर्व कर्मे मीच करत आहे असेच भावना मनात ठेवतात.त्यामुळेच पंचमहाभूते जीवाला त्याच्या अहंकारामुळे व भ्रमा मुळे शोधत शोधत येतात व त्याला पुन्हा पुन्हा देहाची पुन्हा पुन्हा प्राप्ती करून देतात.आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाचे आहे याची जाणीव राहत नाही त्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो.तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव “मी मी” असे करतच आहे तेही वेळोवेळा.



हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आहे तें सकळ कृष्णासी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.