शांतीपरतें नाहीं सुख – संत तुकाराम अभंग – 289

शांतीपरतें नाहीं सुख – संत तुकाराम अभंग – 289


शांतीपरतें नाहीं सुख ।
येर अवघेंची दुःख ॥१॥
म्हणउनी शांति धरा ।
उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥
खवळलिया कामक्रोधीं ।
अंगी भरती आधिव्याधी ॥२॥
तुका म्हणे त्रिविध ताप ।
जाती मग आपेआप ॥३॥

अर्थ
चित्तात शांती असेल तर सुख प्राप्त होते बाकी सर्वत्र दुखच आहे.म्हणून तुम्ही चित्तात शांती धारण करा मग तुम्ही भवसागर तरून जाताल.चित्तात काम क्रोध जर खवळले तर शरीरात व्याधी निर्माण होतात.तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही चित्तात शांती धारण करा मग तुमचे त्रिविध ताप आपोआप नाहीसे होतील.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


शांतीपरतें नाहीं सुख – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.