थोडें परी निरें – संत तुकाराम अभंग – 287
थोडें परी निरें ।
अविट तें घ्यावें खरें ॥१॥
घ्यावें जेणें नये तुटी ।
बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥
चित्त ठेवीं ग्वाही ।
उपचारें चाड नाहीं ॥२॥
आपलें तें हित फार ।
तुका म्हणे खरें सार ॥३॥
अर्थ
आपणास व्यवहारात जे काही हवे असेल तेवढेच घ्यावे जे अवीट आहे जे घ्यावे खरे आहे ते घ्यावे.असे काही घ्यावे त्यापासून नुकसान होणार नाही आणि एका बीजापासून अनेकांची उत्पत्ती होईल असे घ्यावे.काहीही घेताना निरीक्षण करून आपल्या चित्ताला साक्षी ठेवून घ्यावे तेवढेच खूप आहे.तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मध्ये आपले हित आहे तेच घ्यावे तेच खरे आणि ते चांगले.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
थोडें परी निरें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.