रवि रश्मीकळा – संत तुकाराम अभंग – 286
रवि रश्मीकळा ।
नये काढितां निराळा ॥१॥
तैसा आम्हां जाला भाव ।
अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥
गोडी साकरेपासुनी ।
कैसी निवडती दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नाद उठी ।
विरोनि जाय नभा पोटीं ॥३॥
अर्थ
जसे सूर्यापासून सूर्याची किरणे वेगळी करता येत नाही.तसेच आमचा देवाविषयी असलेला भाव आहे त्याचप्रमाणे देव आमच्या सर्वांगात वसलेला आहे.साखर आणि गूळ हे दोन्ही एकच आहेत त्यांना वेगवेगळे करता येईल काय?तुकाराम महाराज म्हणतात उत्पन्न झालेला शब्द जसा आकाशात विलय पावतो तसेच देव आणि आमचे आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
रवि रश्मीकळा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.