आम्हासाठीं अवतार – संत तुकाराम अभंग – 285

आम्हासाठीं अवतार – संत तुकाराम अभंग – 285


आम्हासाठीं अवतार ।
मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥
मोहें धांवे घाली पान्हा ।
नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥
कोठें न दिसे पाहतां ।
उडी घाली अवचिता ॥२॥
सुख ठेवी आम्हासाठीं ।
दुःख आपणची घोंटी ॥३॥
आम्हां घाली पाठीकडे ।
पुढें कळिकाळाशीं भिडे ॥४॥
तुका म्हणे कृपानीधी ।
आम्हां उतरीं नांवेमधीं ॥५॥

अर्थ
मत्स्य कूर्म वराह हे देवाचे अवतार आम्हां भक्तांसाठी देवाने धारण केले आहे.मोहाने या देवाला हाका मारली की तो लगेच धावत येतो आणि प्रितीचा पान्हा सोडतो.कोठे पाहिले तर दिसत नाही पण भक्तांवर संकट आले की तो लगेच अवचितपणे धावं घेऊन भक्तांचे संकट दूर करतो.आमच्यासाठी सुख ठेवतो आणि तो मात्र दुखाचे घोट घेतो.तो आम्हाला पाठीशी येतो आणि स्वतः मात्र कळीकाळाशी लढतो.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तो कृपानिधी नामरूपी नौकेत बसून भवसागरातून तारून नेतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आम्हासाठीं अवतार – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.