साधनें तरी हींच दोन्ही – संत तुकाराम अभंग – 284

साधनें तरी हींच दोन्ही – संत तुकाराम अभंग – 284


साधनें तरी हींच दोन्ही ।
जरी कोणी साधील ॥१॥
परद्रव्य परनारी ।
याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥
देवभाग्यें घरा येती ।
संपत्ती त्या सकळा ॥२॥
तुका म्हणे तें शरीर ।
घर भांडार देवाचें ॥३॥

अर्थ
जर परमार्थात यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर एवढीच दोन साधने करा ती म्हणजे परद्रव्यआणि परनारी यांचा तु विटाळ कर.ही दोन साधने केले तर देव भाग्य हे दोन्ही तुझ्या घरी तसेच सर्व प्रकारची संपत्ती तुझ्या घरी येईल.तुकाराम महाराज म्हणतात ही दोन साधने करणार्‍याचे शरीर म्हणजे देवाचे घर आणि संपत्तीचे संपूर्ण देवाचे भांडार होय.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


साधनें तरी हींच दोन्ही – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.