इच्छावे ते जवळी आलें ।
काय बोलें कारण ॥१॥
नामरूपीं पडिली गांठी ।
अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥
मुकियाचे परी जीवीं ।
साकर जेवों खादली ॥२॥
तुका म्हणे काय बोलें ।
आतां भलें मौन्यची ॥३॥
अर्थ
ज्याची इच्छा होती तेच जवळ आले आहे मग आता बोलायचे काही कारणच राहिले नाही.हरी नामरूपी गाठ पडली आहे त्यामुळे आता काही मिळवायचे किंवा कमवायचे या गोष्टी सगळ्या सरल्या आहेत.एखाद्या मुक्या व्यक्तीने साखर खाल्ली तर त्या साखरेची गोडी त्याला सांगता येणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाच्या सानिध्याने सर्व सुख मिळाले आहे आता मौन धारण करणे बरे आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.