भाव धरी तया तारील पाषाण – संत तुकाराम अभंग – 282
भाव धरी तया तारील पाषाण ।
दुर्जना सज्जन काय करी ॥१॥
करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस ।
खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥
निंबाचिया झाडा साखरेचें आळें ।
बीज तैसीं फळें येती तया ॥२॥
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ ।
कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥
अर्थ
ज्याच्या मनात खरा भाव असेल तर त्याला दगडही तारू शकेल पण दुर्जनाला वळविणे सज्जनाला शक्य नाही.कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ केले तरीही ते सरळ होत नाही आणि खापरा पुढे परिस काय करू शकेल.कडू लिंबाच्या झाडाला जरी साखरेचे आळे केले तरी जसे बीज असेल तसेच फळ येणार.तुकाराम महाराज म्हणतात एक वेळेस वज्राचे ही तुकडे करता येतील पण दुर्जनांचे मन अतिशय कठीण आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भाव धरी तया तारील पाषाण – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.