तुजविण वाणीं आणिकांची थोरी – संत तुकाराम अभंग – 281
तुजविण वाणीं आणिकांची थोरी ।
तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥
तुजविण चित्ता आवडे आणीक ।
तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥
नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी ।
जातु तेचि घडी चांडाळ हे ॥२॥
कथामृतपान न करिती श्रवण ।
काय प्रयोजन मग यांचें ॥३॥
तुका म्हणे काय वांचून कारण ।
तुज एक क्षण विसंबतां ॥४॥
अर्थ
हे हरी तुझ्यावाचून माझी वाणी जर इतरांची स्तुती करील तर माझी जिव्हा झडो.देवा माझ्या चित्ताला जर तुझ्या वाचून दुसरे काही आवडत असेल तर माझे मस्तक फूठून जावो.तुझ्या वाचून जर माझ्या या डोळ्यांनी दुसऱ्या कोणाला आवडीने पाहिल तर त्याचवेळेला माझे चांडाळ डोळे आंधळे होवो.माझ्या कानांनी तुझी कथा श्रवण केले नाही तर मग त्या कानांचा काय उपयोग आहे?तुकाराम महाराज म्हणतात तुला मी एक क्षणभर जरी विसरलो तरीही देवा तश्या जगण्याला काय अर्थ आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तुजविण वाणीं आणिकांची थोरी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.