नटनाट्य अवघें संपादिलें सोंग ।
भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूपा ।
आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे ।
भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित ।
होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥
अर्थ
आम्ही जरी नट स्वरूप धारण केले तरीही आमची आत्मस्थिती बदलत नाही.आम्ही बहुरुप्याचे जरी सोंग घेतले असले तरी आम्ही आमचे खरे स्वरूप जाणतो.स्फटिकाचा दगड रंगाच्या संगतीने अनेक प्रकारचे रंग दाखवितो तो कोणताही रंग धारण करत नाही कारण तो कोणत्याही रंगाचा नसतो.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आत्म बोधाने इतर लोकांपेक्षा वेगळे राहून निश्चिंतपणे संसार करू संसाररूपी खेळ खेळू.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.