दीप घेउनियां धुंडिती अंधार ।
भेटे हा विचार अघटित ॥१॥
विष्णुदास आम्ही न भिओ कळिकाळा ।
भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥
उधळितां माती रविकळा मळे ।
हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥
तुका म्हणे तृणें झांके हुताशन ।
हें तंव वचन वाउगेचि ॥३॥
अर्थ
हातात दिवा घेऊन अंधार शोधण्यासाठी जाणे हे अघटीत आहे कारण अंधार दिव्याला फार भितो.आम्ही विष्णू दास कधीही कळीकाळाला भिणार नाही आणि या मृगजळ रूपी प्रपंचाला कधीही भुलणार नाही.हातात माती घेऊन वर उधळली म्हणजे सूर्य मलीन होईल काय? तसेच आम्ही विष्णुदास या संसाराला भुलु काय?भक्ती न करणाऱ्या भाग्याहीनांना हे काय कळणार?तुकाराम महाराज म्हणतात गवत टाकल्यावर हुताशान म्हणजे अग्नीझाकला जाईल हे म्हणणे व्यर्थ आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.