आमुचा विनोद तें जगा मरण ।
करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥
न कळे सतत हिताचा विचार ।
ते ही दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥
वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें ।
एक गेलें जावें त्याचि वाटा ॥२॥
तुका म्हणे कोणी नाइके सांगतां ।
होती यमदूता वरपडे ॥३॥
अर्थ
आमचा परमार्थ म्हणजे एक विनोद झाला आहे परंतु त्या विनोदाने या जगाचे मरण आहे आमचा पारमार्थिक भाव समजून न घेता फक्त त्याचा देखावा करणारे लोक या जगामध्ये आहेत.स्वतःच्या हिताचाविचार कशात आहे हे समजत नाही ते जन्म मृत्यूच्या दारात कायम ये-जा करत राहतील.जे लोक आमचे अनुकरण करतात ते एखाद्याला वंदन केले तर तेही त्याला वंदन करतात व एखाद्याने निंदिले तर त्यांची निंदा करतात एखादा जर त्या वाटेने पुढे गेला तर त्याच्या मागे तेही जातात.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही सांगितले तरी ते लोक ऐकत नाही म्हणून ते यमदुतांच्या हाती जातात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.