कोण जाणे कोणा घडे – संत तुकाराम अभंग – 277

कोण जाणे कोणा घडे – संत तुकाराम अभंग – 277


कोण जाणे कोणा घडे उपासना ।
कोण या वचनाप्रति पावे ॥१॥
आतां माझा श्रोता वक्ता तूंची देवा ।
करावी ते सेवा तुझीच म्या ॥ध्रु.॥
कुशळ चतुर येथें न पवती ।
करितील रिते तर्क मतें ॥२॥
तुका म्हणे केणें जालें एके घरीं ।
मज आणि हरी तुम्हां गांठी ॥३॥

अर्थ
देवा कोण जाणे तुझी उपासना कोणाला घडेल आणि जरी उपासना कोणाला घडलीच त्याला जरी भक्ती ज्ञानाचे वेड लागले तरी त्याला भक्ती ज्ञान सांगणारा चांगला कोण भेटेल हे कोण जाणू शकते. देवा आता तुला ज्ञान सांगणारा वक्ता मीच आणि तुझ्याकडून ज्ञान प्राप्त करून घेणारा श्रोता देखील मीच तूच माझा श्रोता आणि वक्ता आहेस आणि तुझी मी सेवा करावी हेच बरे. जगामध्ये कुशल आणि चतुर व्यक्ती श्रोता आणि वक्ता हे खूप आहेत ते भक्ती आणि ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यासाठी येथे येणार नाहीत आणि समजा जरी आले तरी आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी तर्क-वितर्क काढून आपले बोलले ते मान्य करणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा हरी आपण दोघांनीही श्रवण करावे आणि एकमेकांना प्रवचन करून भक्ती व ज्ञानाच्या गोष्टी सांगावे अशा पद्धतीने हरी तुझी व माझी गाठ पडत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


कोण जाणे कोणा घडे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.