भीत नाहीं आतां आपुल्या मरणा ।
दुःखी होतां जना न देखवे ॥१॥
आमची तो जाती ऐसी परंपरा ।
कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥
भजनीं विक्षेप तेचि पैं मरण ।
न वजावा क्षण एक वांयां ॥२॥
तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा ।
ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥३॥
अर्थ
मी आता माझ्या मरणाला भीत नाही पण परंतु या लोकांचे दुःख पाहून मला त्यांचे दुःख सहन होत नाही.व देवा आम्हा हरिदासांची अशी परंपरा आहे कि कितीही संकट आले तरीही भ्यायचे नाही हे देवा तुम्हाला हे कसे समजत नाही? भजनांमध्येविक्षेप येणे हेच खरे मरण आहे तुझ्या नामचिंतणा वाचून एक क्षणही वाया जाऊ नये.तुकाराम महाराज म्हणतात देवा मला असे निर्भय स्थान दे कि ज्या ठिकाणी तुझ्या भजनात कुठल्याही प्रकारचा विक्षेप होणार नाही कुठल्याही प्रकारचे भय राहणार नाही व आता जे संकट आले आहे त्याचे तू निवारण कर.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.