काय म्यां मानावें हरीकथेचें – संत तुकाराम अभंग – 275

काय म्यां मानावें हरीकथेचें – संत तुकाराम अभंग – 275


काय म्यां मानावें हरीकथेचें फळ ।
तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥
उच्छेद तो असे हा गे आरंभला ।
रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥
पापाविण नाहीं पाप येत पुढें ।
साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥२॥
तुका म्हणे जेथें वसतील दास ।
तेथें तुझा वास कैसा आतां ॥३॥

अर्थ
हे देवा हरीकीर्तन केल्याने सर्व जण तरतात असे मी मानावे का?हे देवा आमच्यावर संकट येणे म्हणजे सरळसरळ परमार्थाचा उच्छेद चालू आहे असे वाटते.पूर्व जन्मातील पाप असल्याशिवाय असे पाप पुढे येत नाही याचा प्रत्यय प्रसंगाने समोर येत आहे.तुकाराम महाराज म्हणतात जेथे तुझे भक्त राहतात तेथे तुमचा वास आहे हे तुमचे म्हणणे आम्ही खरे कसे मानावे?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


काय म्यां मानावें हरीकथेचें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.