न देखवे डोळां ऐसा हा आकांत ।
परपीडे चित्त दुःखी होतें ॥१॥
काय तुम्ही येथें नसालसें झालें ।
आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥
परचक्र कोठें हरीदासांच्या वासें ।
न देखिजेत देशें राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा ।
हीनपणें देवा जिणें झालें ॥३॥
अर्थ
हे देवा माझ्या डोळ्याने मला लोकांचे दुःख पाहवत नाही माझे चित्त त्यांच्या दुखाने दुखी होत आहे.हे देवा अरे तुम्ही येथे नाही की काय कारण तुम्ही असताना आम्हाला हे दुःख दिसले नाही पाहिजे.आहो देवा हरिदासांवर असे परचक्र येणे हे बरोबर नाही एवढेच काय जेथे हरी दास राहतात तेथे कुठल्याही प्रकारचे आक्रमण होणे हे बरोबर नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा इतके दिवस मी तुझी भक्ती करून देखील संकटकाळी तू मदतीला येत नाहीस याचा अर्थ माझ्या भक्तीला तू लाजविले आहेस म्हणजेच माझे जगणे ही हिनच आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.