कांहींच मी नव्हें कोणिये – संत तुकाराम अभंग – 273
कांहींच मी नव्हें कोणिये गांवींचा ।
एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥
नाहीं जात कोठें येत फिरोनियां ।
अवघेंचि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥
नाहीं मज कोणी आपुलें दुसरें ।
कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥
नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत ।
आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥
तुका म्हणे नांमरूप नाहीं आम्हां ।
वेगळा या कर्मा अकर्मासी ॥४॥
अर्थ
मी काहीही नाही मी कोणत्याही गावाचा नाही मी एकटाच आहे जे ठायीच्या ठायी म्हणजे सर्वत्र आहे असे ब्रम्ह ते मी आहे.मी कोठे जातही नाही आणि फिरुन परत येत नाही मी जे काही बोलतो आहे ते सर्व व्यर्थ आहे.माझे या जगतामध्ये कोणी आपले नाही कोणीही परके नाही व खरोखर पाहायला गेले तर मीही कोणाचा नाही.आम्हाला कधी जगावे किंवा मरावे लागत नाही आणि अखंड जसे आहोत तसेच राहतो.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला नांवही नाही व रूपही नाही आम्ही या कर्म अकर्मापासून वेगळे आहोत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कांहींच मी नव्हें कोणिये – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.