फिरंगी वाखर लोखंडाचे विळे – संत तुकाराम अभंग – 272
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे ।
परि ते निराळे गुणामोल ॥१॥
पायरी प्रतिमा एकचि पाषाण ।
परि तें महिमान वेगळेचि ॥२॥
तुका म्हणे तैसा नव्हतील परी ।
संतजना सरी सारिखिया ॥३॥
अर्थ
तलवार वस्तारा आणि विळा हे सर्वकाही लोखंडापासून तयार झालेले असतात परंतु प्रत्येकाचे गुण हे भिन्न भिन्न असल्यामुळे मोलही भिन्नभिन्न आहेत.पायरी आणि देवाची प्रतिमा ही एकाच दगडापासून बनलेली असते परंतु देवाची प्रतिमा ही पायरीपेक्षा अधिक श्रेष्ठ आणि त्याचा महिमा हि अधिक श्रेष्ठ असतो.तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच संत आणि सामान्य माणसे ही दिसण्यास जरी सारखी असली तरी संतांचा महिमा हा सामान्य माणसापेक्षा श्रेष्ठ असतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.