नाहीं सुख मज न लगे – संत तुकाराम अभंग – 271
नाहीं सुख मज न लगे हा मान ।
न राहे हें जन काय करूं ॥१॥
देहउपचारें पोळतसे अंग ।
विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥
नाइकवे स्तुति वाणितां थोरीव ।
होतो माझा जीव कासावीस ॥२॥
तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा ।
नको मृगजळा गोवूं मज ॥३॥
तुका म्हणे आतां करीं माझें हित ।
काढावें जळत आगींतूनि ॥४॥
अर्थ
देवा मला कोणत्याही प्रकारचे सुख किंवा या लोकांकडून मान सन्मान मिळावा अशी इच्छा नाही पण हे लोक मला मान दिल्याशिवाय राहत नाहीत त्याला मी काय करू?हे लोक माझ्या देहाला सुख होईल असे उपचार करतात पण त्यामुळे माझे शरीर पोळते आणि कोणी मला जर मिष्टान्न खायला दिले तर ते मला विषाप्रमाणे कडू वाटते.कोणीही माझी स्तुती केली तर ती मला आहे ऐकावीशी वाटत नाही त्यामुळे माझा जीव कासावीस होतो.देवा मला तुझी प्राप्ती कशी होईल याबद्दल मला उपायसांग पण मृगजळाप्रमाणे असलेल्या या संसारात मला गुंतवून नकोस.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझे आता एवढेच हित करावे या त्रिविध तापाच्या अग्नीतून मला बाहेर काढावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नाहीं सुख मज न लगे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.