वर्णु महिमा ऐसी नाहीं मज – संत तुकाराम अभंग – 270
वर्णु महिमा ऐसी नाहीं मज वाचा ।
न बोलवे साचा पार तुझा ॥१॥
ठायींची हे काया ठेविली चरणीं ।
आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥
नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा ।
जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥२॥
मज माझें कांहीं न दिसे पाहातां ।
जें तुज अनंता समर्पावें ॥३॥
तुका म्हणे आतां नाहीं मज थार ।
तुझे उपकार फेडावया ॥४॥
अर्थ
देवा तुझा महिमा वर्णन करू शकेल अशी माझी वाणी समर्थ नाही आणि तुझ्या स्वरूपाचा अंतपार माझ्या वाणीला सांगता येणार नाही.देवा तुझ्या चरणांवर तर मी आधीच माझा देह ओवाळून टाकलेला आहे आता तुझ्यावर मी काय ओवाळून टाकू? देवा माझा भक्तीभाव हि असा नाही की मी तुमची सेवा करू शकेल आणि तुमच्या वरून जीव ओवाळून टाकावा तर तो मुळातच तुमचा आहे.देवा पाहिले गेलं तर माझे माझ्याकडे काहीच नाही जे तुला मी अर्पण करावे.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे उपकार फेडण्याकरीता माझ्याकडे माझे काहीच नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
वर्णु महिमा ऐसी नाहीं मज – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.