दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर – संत तुकाराम अभंग – 269

दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर – संत तुकाराम अभंग – 269


दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर ।
घेसील कैवार शरणागता ॥१॥
पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे ।
ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥
आपुल्या दासांचें न साहासी उणें ।
उभा त्याकारणें राहिलासी ॥२॥
चक्र गदा हातीं आयुधें अपारें ।
न्यून तेथें पुरें करूं धावें ॥३॥
तुका म्हणे तुज भक्तीचें कारण ।
करावया पूर्ण अवतारा ॥४॥

अर्थ
हे देवा तुझी या जगामध्ये अनेक ब्रीदे आहेत ते म्हणजे तू दिनानाथ आहेस कृपा घन आहेस कृपा वत्सल आहेस आणि तू शरणागत आलेल्या तुझ्या भक्तांना तारणारा आहेस तू त्यांची बाजू घेणारा आहे हे मात्र निश्‍चित आहे.पुराणामध्ये तुझी कीर्ती वाखाणलेली आहे आता त्याचा मला अनुभव आलेला आहे.आणि भक्तांचे कार्य तत्परतेणे करता यावे यासाठी तुम्ही विटेवर उभे आहात.तुमच्या हातामध्ये चक्र गदा असे अपार आयुधे आहेत आणि भक्तांना काहीही न्यून म्हणजे कमी पडले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही लगेच धाव घेतात.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला अवतार घेण्याकरता भक्तांची भक्ती हे कारणच पुरे आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.