कां रे माझा तुज न ये – संत तुकाराम अभंग – 268
कां रे माझा तुज न ये कळवळा ।
असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥
अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा ।
केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥
कां हें चित्त नाहीं पावत विश्रांती ।
इंद्रियांची गति खुंटेचि ना ॥२॥
तुका म्हणे कां हो धरियला कोप ।
सरलें नेणों पाप पांडुरंगा ॥३॥
अर्थ
हे हृदयस्था नारायणा तू माझ्या इतक्या जवळ आहेस तरीही तुला माझा कळवळा का बरे येत नाही?हे निर्गुणा नारायणा निष्ठुरा अरे तुझ्या प्राप्तीकरता मी कंठ शोक कुठेपर्यंत केला तरी तुला कसे समजत नाही?माझ्या इंद्रियांना विषयाकडे धावण्याची गती लागलेली आहे ती अजूनही का थांबत नाही आणि माझ्या चित्ताला अजूनही विश्रांती म्हणजे समाधान का मिळत नाही?तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू माझ्यावर एवढा राग का धरलेला आहे माझे पाप अजूनही संपलेली नाही की काय?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कां रे माझा तुज न ये – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.